मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे भारताच्या मध्य प्रदेश राज्याचे सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असले तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्यांच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला किंवा युतीला मध्य प्रदेशचे राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतात. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतात.
१ नोव्हेंबर १९५६ रोजच्या मध्य प्रदेश राज्याच्या निर्मितीपासून आजवर १९ नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वाधिक काळ हे पद सांभाळले आहे. १३ डिसेंबर २०२३ पासून मोहन यादव हे पदस्थ आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?