हमादान प्रांत

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हमादान प्रांत

हमादान प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-हमादान ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ १९,३६८ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६ च्या गणनेनुसार या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. हमादान हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.

हमादान प्रांताचा मुलूख डोंगराळ, पठारी आहे. झाग्रोस पर्वतरांगांचा घटक असणाऱ्या आल्वंद पर्वताची माळ हमादानाच्या वायव्येपासून नैऋत्येपर्यंत पसरली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →