हनुमान मंदिरे

या विषयावर तज्ञ बना.

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या 'पहारे' या गावात एक मध्यम आकाराचे हनुमान मंदिर आहे. मंदिराची रचना अत्यंत शोभिवंत असून त्यामध्ये जवळजवळ साडेचार-पाच फूट उंच व ३ फूट रुंद अशी हनुमानाची सुंदर दगडी मूर्ती आहे. पूर्वी हे मंदिर अत्यंत साधे होते. कालांतराने त्यामध्ये बदल घडत गेले. मंदिर गावाच्या मधोमध असल्याने गावकऱ्यांना मंदिरात जाण्यासाठी फारसे चालावे लागत नाही. मंदिराच्या परिसरात खूप जागा असल्याने गावचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तेथेच होतात. येथे दर शनिवारी नारळ फोडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येतात.

या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला 'अखंड हरिनाम सप्ताह' होतो.

मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेकडे आहे याचाही मूर्तीचे वर्णन करताना बऱ्याचदा उल्लेख केला जातो. जसे की पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख, दक्षिणमुखी. पंचमुखी, वगैरे. ’दक्षिणमुखी मारुती’ अनेक असतात. पुण्यात एक आहे, तर काळभोरनगरमध्ये एक आणि निगडीत किमान दोन आहेत. पिंपरी-चिंचवड येथील काळभोरनगरची दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला असून ५६ फूट उंचीची आहे. पंचमुखी हनुमान जबलपूरला आहे आणि डोंबिवलीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →