हंस हा उत्तर खगोलातील आकाशगंगेवरील एक तारकासमूह आहे. त्याचे Cygnus (सिग्नस) हे इंग्रजी नाव मुळात हंस या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. हंस तारकासमूहातील ताऱ्यांपासून फुलीसारखा आकार बनतो, ज्यामुळे हा तारकासमूह सहज ओळखता येतो. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हंस (तारकासमूह)
यामागील विज्ञान आणि इतिहास.