औसाजी तथा हंबीरराव मोहिते (१६३०:तळबीड, महाराष्ट्र - १६८७:वाई, महाराष्ट्र) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर सरसेनापतीपदी त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली.
बहलोल खानाशी लढताना तत्कालीन सरसेनापती प्रतापराव गुजरांनी २४ फेब्रुवारी, १६७४ रोजी वीरमरण पत्करल्यनांतर हंसाजी मोहिते यांची नेमणूक हंबीरराव या खिताबानिशी झाली. नेसरीच्या लढाईनंतर हंबीररावांनी आदिलशाही सेनेवर जबरदस्त उलटहल्ला केला आणि शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावले.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाईंनी हंबीररावांना संभाजी महाराजांऐवजी स्वतःचे पुत्र राजाराम महाराजांना सिंहासनावर बसविण्याची सूचना केली परंतु हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी केलेल्या वारसनाम्याचा आदर करीत स्वतःच्या बहिणीस डावलून संभाजीमहाराजांशी हातमिळवणी केली. यामुळे हे सत्तांतरण अधिक रक्तरंजित झाले नाही.
१६८७मध्ये झालेल्या वाईच्या लढाईत तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले. महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. या नात्याने हंबीरराव शिवाजीमहाराजांचे व्याही होत.
हंबीरराव मोहिते
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.