स्वॉन्झी (इंग्लिश: Swansea; वेल्श: Abertawe) हे युनायटेड किंग्डमच्या वेल्स ह्या घटक देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कार्डिफ खालोखाल) व एक काउंटी आहे. हे शहर वेल्सच्या नैऋत्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते युनायटेड किंग्डममधील एक महत्त्वाचे बंदर आहे. १९ व्या शतकामधील औद्योगिक क्रांतीदरम्यान जगातील सर्वात मोठ्या तांबे उद्योगापैकी एक असलेल्या स्वॉन्झी शहराची दुसऱ्या महायुद्धानंतर काहीशी अधोगती झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वॉन्झी
या विषयावर तज्ञ बना.