बोत्स्वाना

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बोत्स्वाना

बोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया, उत्तरेला झांबिया तर वायव्येला झिम्बाब्वे हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळवंटाने व्यापला आहे. गाबोरोनी ही बोत्स्वानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. केवळ ३.४ इतकी लोकसंख्या घनता असलेला बोत्स्वाना जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे.

१९६६ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हा देश युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगातील सर्वात गरीब असलेल्या बोत्स्वानाने झपाट्याने प्रगती केली आहे व तो सध्या सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या देशांपैकी एक आहे. बोत्स्वाना राष्ट्रकुल परिषद, संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

ह्या भागातील इतर देशांप्रमाणे बोत्स्वानामध्ये एड्स रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. येथील २४ टक्के हे एड्सचे प्रमाण स्वाझीलँड खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →