स्वाहिली विकिपीडिया (स्वाहिली : Wikipedia ya Kiswahili) ही विकिपीडियाची स्वाहिली भाषेतील आवृत्ती आहे. हे नायजर-काँगो किंवा निलो-सहारन भाशांमधील विकिपीडियाची सर्वात मोठी आवृत्ती आहे, या नंतर योरूबा विकिपीडियाचा क्रमांक आहे.
२७ ऑगस्ट २००६ रोजी छोट्या विकिपीडिया भाषेच्या आवृत्तीच्या संघर्षांवर इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून आणि न्यू यॉर्क न्यूजडे यांनी लेखात या विकिपीडियाचा उल्लेख केला होता. २००९ मध्ये, गूगल ने स्वाहिली विकिपीडियामध्ये लेखांच्या निर्मितीस प्रायोजन केले. २० जून २००९ रोजी स्वाहिली विकिपीडियाने त्याच्या मुख्य पृष्ठास मोठा बदल केला. एप्रिल २०२१ मध्ये या विकिपीडियामध्ये सुमारे ६१,००० लेख होते, ज्यामुळे ते ८७ व्या क्रमांकाचे विकिपीडिया बनले.
जानेवारी २०२१ पर्यंत इंग्रजी आवृत्तीनंतर अनुक्रमे १४% आणि ४% पृष्टभेटींसह टांझानिया आणि केन्या मधील स्वाहिली विकिपीडिया हे दुसरे सर्वाधिक लोकप्रिय विकिपीडिया आहे.
स्वाहिली विकिपीडिया
या विषयातील रहस्ये उलगडा.