स्वार्थमोर कॉलेज

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

स्वार्थमोर कॉलेज

स्वार्थमोर कॉलेज हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील स्वार्थमोर शहरातील एक महाविद्यालय आहे. याची स्थापना १८६४मध्ये झाली परंतु पहिला अभ्यासक्रम १८६९मध्ये शिकवण्यात आला. याची स्थापना रिलीजस सोसायटी ऑफ फ्रेंड्स या क्वेकर संस्थेमार्फत झाली. १९०६मध्ये या महाविद्यालयाने धार्मिक संलग्नता झुगारून देत स्वतःला निधर्मी शिक्षणसंस्था जाहीर केले..

स्वार्थमोर कॉलेज अमेरिकेतील लिंगभेद न करणाऱ्या सर्वात पहिल्या मिश्र शिक्षणसंस्थांपैकी एक आहे.

हे महाविद्यालय कलाशाखांतील पदवी अभ्यासक्रम चालवते. येथे पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध नाही. स्वार्थमोर हे ब्रायन मॉर कॉलेज आणि हॅवरफोर्ड कॉलेज यांच्याबरोबर ट्राय-कॉलेज कन्सोशियमचे सदस्य आहे, एक सहकारी शैक्षणिक व्यवस्था आहे. स्वार्थमोर हे क्वेकर कन्सोर्शियमद्वारे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाशी देखील संलग्न आहे. या व्यवस्थेमुळे स्वार्थमोरचे विद्यार्थी चारही संस्थांमधील वर्गांमध्ये शिक्षण घेऊ शकतात.

स्वार्थमोरच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये सहा नोबेल पारितोषिक विजेते, १३ मॅकआर्थर फाउंडेशन फेलो, तसेच टोनी पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार, अकादमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि गुगेनहाइम फेलोशिपचे विजेते यांचा समावेश आहे. पुलित्झर पुरस्कार विजेते लेखक जेम्स मिशनर हे येथील विद्यार्थी होते. त्यांनी आपली सर्व मालमत्ता मृत्युपश्चात स्वार्थमोर कॉलेजला दान केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →