ट्रिनिटी कॉलेज हे इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठाचा भाग असलेले महाविद्यालय आहे. याची स्थापना हेन्री आठव्याच्या राज्यकालात १५४६मध्ये झाली होती.
ट्रिनिटी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये युनायटेड किंग्डमच्या सहा तसेच सिंगापूर, थायलंड, फ्रांस आणि भारताच्या प्रत्येकी एक पंतप्रधानांचा समावेश होतो. येथे विद्यार्थी असलेल्या आयझॅक न्यूटन, नील्स बोह्र, अर्नेस्ट रदरफोर्ड, अमर्त्य सेन, बर्ट्रांड रसेल, सुब्रम्हण्यन चंद्रशेखर, वेंकटरामन रामकृष्णन यांसह ३४ व्यक्तींना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. याशिवाय फ्रांसिस बेकन, एडवर्ड आठवा, रणजितसिंहजी, जी.एच. हार्डी, आल्फ्रेड टेनिसन, विल्यम थॅकरे, इ. अनेक ख्यातनाम व्यक्ती येथील विद्यार्थी होत्या.
ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.