स्वाभिमान चळवळ (इंग्रजी: The Self-Respect Movement तमिळ:சுயமரியாதை இயக்கம்/सुयमरियादै इयक्कम) ह्या चळवळीची स्थापना, तमिळनाडूचे वरिष्ठ पुढारी पेरियार ई.व्ही.रामस्वामी ह्यांनी १९२५ साली तमिळनाडूत केली. मागासवर्गीयांना उच्चवर्णीयांच्या बरोबरीने समान हक्क आणि वागणूक मिळेल अशी समाज रचना निर्माण करणे, असे ह्या चळवळीचे उद्दिष्ट होते. मागासवर्गीयांमध्ये जातीविषयी असलेला न्यूनगंड नष्ट करून स्वाभिमान निर्माण करणे हाही एक चळवळीचा उद्देश होता. ही चळवळ फक्त तमिळनाडूच नव्हे तर परप्रांतात स्थापित झालेल्या इतर तमिळ जनतेमध्येसुद्धा खूप प्रभावी ठरली. तमिळवेल जी.सारंगपाणि ह्यांच्या पुढाकाराने निघालेल्या ’तमिळ नवनिर्माण संघटना’ नावाच्या संघटनेने नियतकालिकांत लिखाण करून व तमिळ शाळांत प्रचार करून, विशेषतः मलेशिया व सिंगापूर येथील तमिळ विस्थापित आणि सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या तमिळींमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आणि स्वाभिमान चळवळीचे तत्त्व जनमानसांत पोहचविले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वाभिमान चळवळ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.