स्वाती चतुर्वेदी

या विषयावर तज्ञ बना.

स्वाती चतुर्वेदी या एक भारतीय पत्रकार आणि लेखिका आहेत. त्यांनी द स्टेट्समन, द इंडियन एक्स्प्रेस, हिंदुस्तान टाईम्स, द ट्रिब्यून, एनडीटीव्ही, डेलीओ, द वायर, गल्फ न्यूझ आणि डेक्कन हेराल्ड सारख्या विविध भारतीय वृत्तपत्रे आणि वाहिन्यांसाठी काम केले आहे.

त्यांनी दोन पुस्तकेही प्रकाशित केली आहेत; पहिले पुस्तक डॅडीज गर्ल आहे; "आय एम अ ट्रोल: इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ द बीजेपीज डिजिटल आर्मी" हे दुसरे पुस्तक आहे. यापैकी दुसरे पुस्तक विशेष गाजले. डॅडीज गर्ल या कादंबरीत आरुषी तलवार प्रकरणाचा उल्लेख आहे तसेच यात त्यांनी माध्यमांवर टीका केली.

२०१८ मध्ये स्वाती चतुर्वेदी यांना प्रतिकूल वातावरणात पत्रकारितेसाठी रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने दिला जाणारा धैर्याचा पुरस्कार जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →