कोण आहेत सौ. स्मिता वाघ?
१७ व्या लोकसभा निवडणुकांसाठी जळगाव मतदार संघातून सौ. स्मिता वाघ यांना भाजप कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. स्मिता वाघ अमळनेरच्या रहिवासी असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे मूळ गाव अंदरसुल (ता. येवला जि. नाशिक) असून हल्ली मुकाम अमळनेरच आहे.
स्मिता वाघ यांचे सासरे २५ वर्ष सरपंच राहिलेले आहेत तर वडीलही पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. त्यामुळे बालपणापासून घरात राजकीय वातावरणाचे संस्कार त्यांच्यावर रुजले व वडील आणि सासरे यांच्या प्रेरणेतूनच त्यांच्यात एक कार्यकर्तीचा जन्म झाला असे त्या अभिमानाने सांगतात.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी गाजलेल्या तत्कालीन आंदोलनात स्मिता वाघ यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. [- ९०]च्या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्यांनी धडाडीने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यात 'राष्ट्रवाद' व 'राष्ट्र प्रथम' या विचारांची मुळे रुजली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची वैचारिक बांधिलकी असून संघ परिवाराच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.
स्मिता उदय वाघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.