स्पृहा शिरीष जोशी ( १३ ऑक्टोबर १९८९) या एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या स्पृहा जोशी ह्या झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट व एका लग्नाची तिसरी गोष्ट, इत्यादी मालिका आणि सूर नवा ध्यास नवा, किचनची सुपरस्टार कार्यक्रमांमध्ये चमकल्या. ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.
स्पृहा जोशी या एक कवयित्री देखील आहेत. संगीत दिग्दर्शक कौशल इनामदारच्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.
स्पृहा जोशी या दूरचित्रवाणीवर अँकरही असतात. 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. 'सूर नवा ध्यास नवा' या 'रिॲलिटी शो'त पहिल्या सीझनच्या अँकर तेजश्री प्रधानची जागा दुसऱ्या सीझनमध्ये स्पृहाने घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मराठीतील असंख्य मान्यवरांसोबत "आठवणीतला खजिना" हा ऑनलाईन कार्यक्रम सादर केला.
स्पृहा जोशी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.