स्नेहसुधा कुलकर्णी

या विषयातील रहस्ये उलगडा.

डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी एम.ए. पीएच.डी या एक मराठी कथालेखिका, कादंबरीकार, संपादक, गीतकार, कवयित्री आणि प्रकाशिका आहेत. त्या नीहार या वार्षिक दिवाळी अंकाच्या संपादिका असतात. नीहारा प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशनसंस्था आहे.



बार्शीसारख्या छोट्या गावात राहणाऱ्या स्नेहसुधा कुलकर्णी यांनी वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेली ३२ कडव्यांची कविता पुण्यातील एका ख्यातनाम वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.

वडिलांचे निधन लवकर झाल्यामुळे स्नेहसुधाताईंचे बालपण अत्यंत खडतर असेच गेले. पण त्या काळातही शिक्षण आणि कविता करणे सुरूच होते. दैवाने त्यांना मिळालेली प्रतिभा त्यांनी वाचनाने व योग्य ते प्रयत्‍न करून फुलवली.

इंग्रजी व मराठी घेऊन दोन वेळा बी.ए., तर दोन वेळा एम.ए. करून त्यांनी शिवाय बी.एड. केले आहे. त्यानंतर विद्यावाचस्पती, अर्थातच डॉक्टरेट ही पदवी मिळवण्याचेही आव्हानही त्यांनी पूर्ण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →