स्ताद दा फ्रान्स (फ्रेंच: Stade de France) हे फ्रान्स देशाचे राष्ट्रीय स्टेडियम आहे. सीन-सेंत-देनिस विभागातील सेंत-देनिस ह्या पॅरिसच्या उपनगरामध्ये स्थित स्ताद दा फ्रान्स हे युरोपातील पाचव्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. येथे ८१,३३८ प्रेक्षकांची बसण्याची सोय होऊ शकते. फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल व रग्बी संघ हे मैदान आपापल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरतात.
हे स्टेडियम २ मे १९९५ रोजी बांधण्यात आले व २८ जानेवारी १९९८ रोजी उद्घाटित करण्यात आले. १९९८ फिफा विश्वचषकासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. सध्या फ्रान्स फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथूनच खेळतो.
स्ताद दा फ्रान्स
या विषयातील रहस्ये उलगडा.