सोहनी महिवाल हा १९८४ चा इंडो-सोव्हिएत ऐतिहासिक प्रणय नाटक चित्रपट आहे जो त्याच नावाच्या पंजाबी लोक प्रेम आणि शोकांतिकेवर आधारित आहे. ह्याचे दिग्दर्शन उमेश मेहरा (भारत) आणि लतीफ फैजीव (सोव्हिएत संघ) यांनी केले आहे. यात सनी देओल, पूनम ढिल्लन आणि झीनत अमान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाची कथा जावेद सिद्दीकी, शांती प्रकाश बक्षी आणि ओलमास उमरबेकोव्ह यांनी लिहिली होती आणि संगीत अनू मलिक यांनी दिले होते. चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले आणि त्याने ७.२ कोटींची कमाई केली.
सोहनी महिवाल (१९८४ चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?