सोशल इन्क्ल्यूजन अँड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन डेव्हलपमेंट अँड डेप्रिव्हेशन ऑफ आदिवासी इन इंडिया या पुस्तकाचे संपादन देव नाथन आणि वर्जिनिअस खाखा यांनी केलेले आहे. सदर खंड हा 'भारतातील आदिवासींचा विकास आणि बदल' या विषयीच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात जे अभ्यासात्मक पेपर सादर केलेले आहेत.त्या सर्व लेखनां एकत्रित करून तयार करण्यात आला आहे.वरील विषयाचा परिसंवाद हा Institution for Human Development(IHD) या संस्थेने आयोजित केला होता.भारतातातील आदिवासी समाज हा एकूणच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात कसा नेहमीच वगळला जातो व याचा परिणाम त्यांच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहण्यात होतो. तसेच त्यांच्या परिस्थितीची मीमांसा सामाजिक व राजकीय दृष्टीने महत्त्वाची अशी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोशल इन्क्ल्यूजन अँड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?