प्रस्तुतच्या लेखात सोलापुरी शहरातील बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्रीयदृष्ट्या विचार करता सोलापुरी बोलीभाषा ही स्वतंत्र बोली ठरत नाही. कारण सोलापुरी भाषेची प्रमाणभाषेहून वेगळी अशी भाषिक रूपे सिद्ध झालेली नाहीत. बोली होण्याकरिता स्वतंत्र शब्दरूप, अर्थरूप, औच्चारिक रूप सिद्ध व्हावे लागते. बोलीभाषा ही प्रमाणभाषेहून दुसऱ्या भाषेइतकी वेगळी नसते; पण तिचे वेगळेपण जाणवते. असा वेगळेपणा सोलपुरी बोलीभाषेत जाणवत नाही. या बोलीभाषेत प्रमाणभाषेहून वेगळी जाणवणारी काही वैशिष्ट्ये आहेत, पण ती सोलापूर शहरातील उद्योगधंदे, बहुभाषिक लोक यांमुळे तयार झाली आहेत.. .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोलापुरी बोलीभाषा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.