सोनू वालिया (१९ फेब्रुवारी, १९६४ - ) एक बॉलीवूड अभिनेत्री, मिस इंडिया स्पर्धेची विजेती आणि मॉडेल आहे. तिचे मूळ नाव संजीत कौर वालिया आहे. १९८९ मध्ये, खून भरी मांग या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. वालिया मानसशास्त्र पदवीधर असून तिने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. वालियाने मिस इंडिया स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी मॉडेलिंग केले.
वालियाने अमेरिकेतील मूळ भारतीय असलेल्या चित्रपट निर्माता आणि होटेल व्यावसायिक सूर्य प्रताप सिंग यांच्याशी लग्न केले. २००९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
सोनू वालिया
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.