शरद केळकर (७ ऑक्टोबर, १९७६- ग्वालियर, मध्य प्रदेश) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमधील कामांसाठी ओळखला जातो. बाहुबली चित्रपट शृंखलेतील प्रभासचा हिंदी आवाज म्हणून त्याला ओळखले जाते. केळकरने बॉलीवूड, मराठी, टॉलिवूड, कॉलीवूड चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका आणि भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.
जानेवारी २०२० मध्ये त्याने तान्हाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या भूमिकेसाठी त्याचे खूप कौतुक झाले. तो लक्ष्मी चित्रपटात देखील दिसला जिथे पहिल्यांदा एका तृतीयपंथीची भूमिका त्याने केली होती. या भूमिकेसाठीही त्याची प्रशंसा झाली.
शरद केळकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?