सोनिया परचुरे या एक मराठी नर्तकी, नृत्यशिक्षक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यअभिनेत्री आहेत. भारतीय नृत्यशैली, विशेषतः कथ्थक या नृत्यप्रकारात त्या वाकबगार आहेत.
वयाच्या सहाव्या वर्षी सोनिया परचुरे यांनी नृत्यगुरू पूनम मुरडेश्वर यांच्याकडे नाच शिकायला सुरुवात केली. सोनिया परचुरे यांनी कथ्थक गुरू आणि गोपीकृष्ण यांच्या शिष्या डॉ. मंजिरी देव यांच्याकडे १५ वर्षे कथ्थकचे कठोर प्रशिक्षण घेतले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्यविशारद आणि नृत्यालंकार या दोनही परीक्षात त्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध तबलावादक तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडून ’लयकारी’चे प्रशिक्षण घेतले.
मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांच्या त्या पत्नी आहेत.
सोनिया परचुरे
या विषयातील रहस्ये उलगडा.