गौरी जोग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

गौरी जोग

गौरी जोग शिकागो येथील कथ्थक नृत्यांगना, कोरिओग्राफर आणि रिसर्च स्कॉलर आहेत. त्या कथ्थक नृत्याचा सराव करतात. त्या लखनौ आणि जयपूर घराण्याच्या एक सूत्रधार मानल्या जातात. त्यांच्या निर्मितीमध्ये कृष्ण लीला, शकुंतला, झाशी की राणी, कथक यात्रा, ईस्ट मीट्स वेस्ट, फायर - द फायरी टेल यांचा समावेश आहे. कथ्थकमधील तांत्रिक घटकांद्वारे त्या पारंपारिक "कथा सांगण्याची कला" जिवंत करतात. परंपरेच्या सीमा ओलांडू नयेत याची काळजी घेत कथ्थकमध्ये काही बॉलीवूड स्टेप्स आणि योग एकत्र करण्याच्या त्यांच्या अनोख्या पद्धतीमुळे त्या विशेषतः तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहेत. फ्लेमेन्को, भरतनाट्यम, ओडिसी, मेक्सिकन आणि अमेरिकन बॅलेसह कथ्थक एकत्र करून त्यांच्या प्रयोगांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९९९ पासून गौरी जोग आणि त्यांच्या गटाने उत्तर अमेरिका आणि भारतात ३२५हून अधिक नृत्य कार्यक्रम सादर केले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →