सॉफोक्लीस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सॉफोक्लीस

सॉफोक्लीस (ग्रीक: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ - अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी सॉफोक्लीस हा कालानुक्रमे दुसरा लेखक होता (एशिलसनंतरचा व युरिपिडसच्या आधीचा). त्याने अंदाजे १२३ शोकांतिका लिहिल्या युरिपिडिस व सोफोक्लीस यांमध्ये सॉफोक्लीस अधिक लोकप्रिय होता, असे दिसते. धार्मिक उत्सवातील सर्वाधिक नाट्यस्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. त्याने पौराणिक नायकांना असामान्य परिस्थितीतले सामान्य नायक म्हणून रंगवले आणि नाटकांत वास्तववाद आणला. त्याच्या नाटकांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत.

सॉफोक्लीसचे 'ओडिपस रेक्स' हे नाटक ‘आदिपश्य’ या नावाने पु.ल. देशपांडे यांनी मराठीत आणले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →