सेक्रेड गेम्स ही एक भारतीय वेब दूरदर्शन थरार वेब मालिका आहे, जी विक्रम चंद्र यांच्या २००६ च्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. या मालिकेचा पहिला सीझन ५ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध झाला होता. सॅक्रेड गेम्स ही भारतातील पहिली नेटफ्लिक्स मूळ वेब मालिका आहे. विक्रमादित्य मोटवणे आणि अनुराग कश्यप यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे .केली लुजेनबिएहल, एरिक बार्माक आणि मोटवणे या मालिकेचे निर्माते होते. सरताजसिंग नावाच्या पोलिसांची भूमिका सैफ अली खानने साकारली आहे, तो या मालिकेचा मुख्य मुख्य आहे .राधीका आपटे, गिरीश कुलकर्णी, नीरज कबी, जीतेंद्र जोशी, राजश्री देशपांडे, करण वाही, सुखमणी सदना, आमिर बशीर अशा सैफ कलाकारांसोबत जतीन सरना, एलनाझ नौरौझी, पंकज त्रिपाठी, अमे वाघ आणि कुब्रा सैत यांनी या मालिकेत भूमिका केल्या आहेत. सरताज सिंग (सैफ अली खान) मुंबईतील एकपोलिस अधिकारी आहे, ज्याला गँगस्टर गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) यांचा फोन आला. गणेश गायतोंडे सरताजला २५ दिवसात मुंबईला वाचवायला सांगतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सॅक्रेड गेम्स (दूरचित्रवाणी मालिका)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.