सूरज एंगडे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सूरज एंगडे

डॉ. सूरज मिलिंद एंगडे (जन्म इ.स. १९८८) हे एक भारतीय संशोधक, मानवाधिकार कार्यकर्ते, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते, वकील व लेखक आहेत. ते मूळचे नांदेडचे असून अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहेत. एंगडे हे भारतातील आघाडीचे विचारवंत आणि जातव्यवस्थेचे प्रख्यात अभ्यासक आहेत. ते बेस्टसेलर 'कास्ट मॅटर्स'चे लेखक आणि 'द रॅडिकल इन आंबेडकर'चे सह-संपादक आहेत. ते नेहमी सुटाबुटात वावरतात, व त्यांची आफ्रिकन हेअरस्टाईल आहे. ते संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमात काम करतात. जीक्यू इंडिया मासिकाने त्यांना २०२१ मधील २५ सर्वाधिक प्रभावशाली तरुण भारतीयांमध्ये सूचीबद्ध केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →