सूक चिंग- चिनी लोकांचे निर्मूलन- हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्याने सिंगापूरमध्ये केलेले हत्याकांड होते.
दुसऱ्या महायुद्धात, जपानी सैन्याने यशस्वीरीत्या मलेशियावर चढाई केली व त्याची सांगता सिंगापूरवरील विजयात झाली. त्यानंतर, १८ फेब्रुवारी ते ४ मार्च १९४२ या कालावधीत सिंगापूर मध्ये जपानी सैन्याकडून केलेल्या नागरिकांच्या भीषण कत्तलीला, 'सूक चिंग' म्हणजेच चिनी लोकांचे निर्मूलन असे म्हणतात. 'सूक चिंग' या शब्दाचा वापर, सिंगापूरच्या राष्ट्रीय वारसा समिति (नॅशनल हेरिटेज बोर्ड) [१] कडून , सिंगापूर मधील चिनी वंशाच्या नागरिकांची जी हत्या केली गेली, ती दर्शविण्यासाठी वापरला जातो.
१९३७ पासून चालू असलेल्या दुसऱ्या जपान-चीन युद्धामुळे, सरसकट सर्व चिनी वंशाच्या नागरिकांना, 'जपानी सम्राज्यासाठी धोकादायक', असे मानण्यात आले व अनेक नागरिकांची हत्या करण्यात आली.
१५ फेब्रुवारी १९६७ रोजी, या कत्तली मध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभारण्यात आले. [२] या स्मारकमध्ये, सिंगापूर मधील चार प्रमुख भाषिक लोकांना (इंग्लिश, चिनी, मलय, तमिळ), दर्शविण्यासाठी चार खांब आहेत. तसेच या चार भाषांमधून लेख लिहिलेले आहेत. दरवर्षी १५ फेब्रुवारीला, येथे युद्धात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
सूक चिंगची कत्तल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!