जपानचा इतिहास
जपानचा इतिहास म्हणजे जपानची काही बेटे व तिथल्या लोकांचा प्राचीन काळापासून ते आजपर्यंतचा इतिहास होय. इ.स. पूर्व १२००० पासून (शेवटच्या हिमयुगानंतर) जपानी बेटांचा समूह मानवी वसाहतीसाठी अनुकूल बनला. जपानमध्ये सापडलेली सर्वात जुनी मातीची भांडी
जोमोन कालखंडातील आहेत. जपानचा पहिला लिखित संदर्भ हा इ.स. १ ल्या शतकात चोवीस इतिहास या चिनी ऐतिहासिक दाखल्यामध्ये थोडक्यात आढळतो. जपानवर चीनचा मुख्य धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव असल्याचे समजते.
जपानची पहिली राजधानी नारा येथे इ.स. ७१० मध्ये स्थापित करण्यात आली; जी बौद्ध कला, धर्म व संस्कृतीचे केंद्र बनली.आजचे राजघराणे इ.स. ७०० च्या सुमारास उदयास आले. १८६८ पर्यंत त्यांना उच्च प्रतिष्ठा प्राप्त होती पण कमी राजकीय अधिकार व शक्ती होती. इ.स. १५५० पर्यंत राजकीय शक्ती हजारो छोट्या स्थानिक एककांत विभाजित झाली होती, ज्यावर स्थानिक डायम्यो (देव)चे वर्चस्व असे व प्रत्येक डायम्यो कडे सामुराई योद्ध्यांची फौज असे. इ.स. १६०० मध्ये तोकुगावा लेयासु सत्तेवर आला ज्याने आपल्या समर्थकांना जमिनी दिल्या व एदो (आताचे तोक्यो ) येथे बाकूफू (सरंजामशाही)ची रचना केली.तोकुगावाचा कालखंड भरभराटीचा व शांततेचा होता आणि जपानने ख्रिश्चन मिशनला संपुष्टात आणले आणि बाहेरील विश्वासोबतचे सर्व संबंध तोडले.
१८६० मध्ये मेईजी कालखंड चालू झाला आणि नवीन राष्ट्रीय नेतृत्वांनी पद्धतशीरपणे सरंजामशाही पद्धतीचा अंत केला आणि पश्चिमी आदर्शांना अनुसरून एका विरक्त, अविकसित बेटांच्या देशाला विश्व शक्तीचे स्वरूप प्रदान केले. जपानचे प्रबळ लष्कर पूर्णपणे स्वतंत्र नव्हते व त्यांनी १९२० व १९३० मध्ये मुलकी अधिकाऱ्यांचा विश्वासघात केला होता, ज्यामुळे लोकतंत्र अनिश्चित होते. १९३१ पासून जपानी लष्कर चीनमध्ये घुसले व १९३७ मध्ये चीनवर संपूर्ण शक्तीने व योजनाबद्ध पद्धतीने युद्ध घोषित केले. जपानने पूर्व चीनमधील मांचुरियाच्या महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेऊन तेथे त्याच्या नियंत्रणाच्याखालील
कळसूत्री सरकार स्थापन केले, परंतु तो चीनला पराभूत नाही करू शकला. डिसेंबर १९४१ मध्ये पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यामुळे जपानचे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांशी युद्ध सुरू झाले. १९४२ च्या मध्यात जपानी आरमाराच्या विजयाच्या मालिकेमुळे त्यांचे लष्कर झपाट्याने वाढले व त्यांना जहाजे, युद्धसामग्री आणि तेलाचा पुरवठा कमी पडू लागला.जपानी सैन्याने हाँगकाँग हे दक्षिण चीनमधील शहर तसेच सिंगापूर,मलेशिया,फिलीपाईन्स,तैवान,म्यानमार इत्यादी देश जिंकले. भारताच्या ईशान्य,पूर्व सीमेपर्यंत जपानी सैन्य येऊन पोचले. नंतर जपानचे आरमार बुडले व त्याची महत्त्वाची शहरे हवेतून नष्ट करण्यात आली असताना देखील सम्राट शोवाने ऑगस्ट १९४५ पर्यंत लढा दिला, परंतु हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर दोन अणुबॉम्बच्या हल्ल्यांच्यामुळे जपानला शरण जाणे भाग पडले.
१९५५ नंतर जपानने उच्च आर्थिक वृद्धी दर गाठला व जगाचे आर्थिक शक्तिस्थान बनले; मुख्यतः अभियांत्रिकी (engineering), वाहन व इलेक्ट्रॉनिक्समध्ये १९९० पासून आर्थिक स्थैर्य हा जपानसाठी मोठा मुद्दा बनला आहे. २०११ मधील त्सुनामी व भूकंपामुळे मोठे आर्थिक नुकसान झालं आणि देशाच्या अणुशक्तीचे ही नुकसान झाले. १९६४ मध्ये सांतो एकीदा हे पंतप्रधान झाले जपानच्या भवितव्याचा विश्वास हा त्यांच्या धोरणाचा मुख्य आधार होता अमेरिकेशी घनिष्ठ मैत्री करून त्यांनी परराष्ट्र धोरणामध्ये अनेक नवे उपक्रम राबवले इतकेच नाही तर अमेरिकन तळ असलेल्या ओकिनावा बेटावर अमेरिका आपले नियंत्रण कमी करण्यास तयार नव्हता पण जपान मध्ये ओकिनावा बेटासाठी मोहीमच सुरू झाल्यामुळे अमेरिकेने ओकिनावा बद्दल संयुक्त समीक्षा करण्याची कबुली दिली १९६८ मध्ये अमेरिकेने उगाच वारा दोन्ही बेटे जपानला सोपवली १९६९मध्ये अमेरिकेने ओकिनावा भेट १९७२ पर्यंत जपानला देण्याचे आश्वासन दिले यामुळे १९७० मध्ये उभयपक्षी सुरक्षा आणि सहकार्याच्या कराराचे नूतनीकरण झाले. सांगतोने या राजकीय विजयाचे भांडवल करून निवडणुका घेतल्या व उदार लोकशाहीवादी पक्षाची शक्ती त्यांनी जपानमध्ये वाढवली.
जपानचा इतिहास
यामागील विज्ञान आणि इतिहास.