जपानी साम्राज्य (जपानी: 大日本帝國) हे इ.स. १८६८ ते इ.स. १९४७ या कालखंडात अस्तित्वात असलेले, वर्तमान जपान देशाचे पूर्ववर्ती साम्राज्य होते. ३ जानेवारी, इ.स. १८६८ रोजी मेइजी पुनर्स्थापनेनंतर हे साम्राज्य उदय पावले व दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर ३ मे, इ.स. १९४७ रोजी या साम्राज्याचा अस्त झाला.
जपानी साम्राज्याने "फुकोकु क्योहेई" (जपानी: 富国強兵 ; अर्थ: देश श्रीमंत करा! सैन्याची ताकद वाढवा!) या प्रकल्पांतर्गत देशाचे सैनिकीकरण व उद्योगीकरण आरंभले. यामुळे जपानी साम्राज्य जागतिक शक्ती बनले.
जपानी साम्राज्यकाळादरम्यान ह्या देशाने झपाट्याने प्रगती केली व तो जगातील एक प्रगत देश बनला. साम्राज्यवाढीने झपाटलेल्या जपानी राज्यकर्त्यांनी दुसऱ्या महायुद्धात अक्ष राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली व पूर्व आशियामधील अनेक देशांवर लष्करी चढाया केल्या. हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर जपानी साम्राज्याने २ सप्टेंबर १९४५ रोजी दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर अमेरिकेच्या मदतीने जपान देशाचे संविधान पुन्हा लिहिले गेले व ३ मे, इ.स. १९४७ रोजी जपान ह्याच नावाने हा देश ओळखला जाऊ लागला.
जपानी साम्राज्य
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.