टोमोयुकी यामाशिता

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

टोमोयुकी यामाशिता

Tomoyuki Yamashita टोमोयुकी यामाशिता- (८ नोव्हेंबर १८८५ ते २३ फेब्रुवारी १९४६) हे दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्यातील जनरल होते व युद्ध संपल्यावर युद्धातील गुन्ह्यांबद्दल त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.



जपानी साम्राज्याच्या दक्षिण आशियातील विस्तारामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. १९४२ मध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली, जपानी सैन्याने ब्रिटिश साम्राज्यातील मलेशिया (ब्रिटिश मलया) व सिंगापूर हे केवळ ७० दिवसांमध्ये, युद्धात जिंकून घेतले. इतिहासात 'मलेशियाची चढाई'[१] व 'सिंगापूरचा पाडाव'[२] या नावाने या लढाया ओळखल्या जातात. या पराक्रमामुळे त्यांना ‘मलेशियाचा वाघ’ म्हणून ओळखले गेले; तर सिंगापूरचा पाडाव हा ब्रिटिश साम्राज्यातील सर्वात नामुष्कीचा व साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारा ठरला.

पुढे यामाशिता यांची नेमणूक फिलिपाईन्स मध्ये मित्र राष्ट्रांची चढाई रोखण्यासाठी झाली. इथे त्यांना यश मिळाले नाही, परंतु युद्ध संपेपर्यंत (ऑगस्ट १९४५) लुझॉन [३] चा काही भाग जपानच्या अधिपत्याखाली ठेवण्यात त्यांना यश आले.

युद्धात जपानचा पाडाव झाल्यावर युद्धकैदी म्हणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने केलेल्या अत्याचारांना जाणून बुजून न रोखल्याबद्दल, त्यांना १९४६ मध्ये मृत्युदंडाची सजा सुनावण्यात आली. अशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय कायद्या मध्ये-, हाताखालील सैनिकांनी केलेल्या अत्याचारासाठी, अधिकाऱ्याला जबाबदार ठरविणे व सैनिकांना न थांबविल्याबद्दल शिक्षा करणे-, याला 'यामाशिता स्टँडर्ड'[४] असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →