दुसऱ्या महायुद्धात ८ डिसेंबर १९४१ ते १५ फेब्रुवारी १९४२ या दरम्यान तत्कालीन ब्रिटिश मलय प्रांत जिंकण्यासाठी जपानने केलेल्या स्वारीला मलेशिया मोहीम [१] असे नाव आहे. यात जपानचा विजय होउन त्यांनी ब्रिटिश मलय प्रांतातून ब्रिटिशांना हाकलून दिले.
या युद्धात जपानी आरमार व वायुसेना यांचे पहिल्यापासून वर्चस्व राहिले. या शिवाय जपानी सैन्याने सायकलींचा परिणामकारक वापर करून [२] मलेशियातील घनदाट जंगलात अत्यंत वेगाने प्रवास करून युद्ध जिंकले. ब्रिटिश सैन्यामध्ये, ब्रिटिश, भारतीय व मलय सैनिकांचा समावेश होता. या सैन्याने माघार घेत असताना, वाटेवरील अनेक पूल उद्ध्वस्त केले, परंतु जपानी चढाईचा वेग रोखण्यात ते यशस्वी ठरले नाही. या चढाईचा शेवट जपानच्या सिंगापूर वरील विजयाने झाला.
जपानची मलेशिया मोहीम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?