सुसिलो बांबांग युधोयोनो (बासा जावा: Susilå Bambang Yudhåyånå; सप्टेंबर ९, इ.स. १९४९) हा इंडोनेशिया देशामधील एक राजकारणी, लष्करी अधिकारी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑक्टोबर २००४ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.
२००४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मेगावती सुकर्णोपुत्रीला पराभूत करून युधोयोनो सत्तेवर आला. २००९ सालच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विजय मिळवून त्याने सत्ता राखली. इंडोनेशियाच्या संविधानानुसार एका व्यक्तीला केवळ दोन वेळा (कमाल १० वर्षे) राष्ट्राध्यक्ष राहता येते. त्यानुसार २० ऑक्टोबर २०१४ रोजी युधोयोनो सत्तेवरून पायउतार झाला.
सुसिलो बांबांग युधोयोनो
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?