सुषमा सेठ (२० जून, १९३६) या एक भारतीय नाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत. त्यांनी १९५० च्या दशकात नाटकात काम करत आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि दिल्ली-आधारित थिएटर ग्रुप 'यात्रिकच्या' त्या संस्थापक सदस्य बनल्या. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी जुनून या हिंदी चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले. सेठ या हिंदी चित्रपटात 'माँ' आणि 'दादी'च्या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. याशिवाय दूरदर्शन वरील मालिका हम लोग (१९८४-१९८५) मधील दादीच्या भूमिकेसाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी देव राज अंकुर, राम गोपाल बजाज, मनीष जोशी बिस्मिल आणि चंदर शेखर शर्मा यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुषमा सेठ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.