सुविज्ञ शर्मा

या विषयातील रहस्ये उलगडा.

सुविज्ञ शर्मा

सुविज्ञ शर्मा (२८ जुलै, १९८३:जयपूर, राजस्थान, भारत - ) हे एक भारतीय कलाकार, चित्रकार, फॅशन डिझायनर आणि उद्योजक आहेत. ते सूक्ष्म चित्र (मिनिएचर पेंटिंग), तंजावर चित्र, फ्रेस्को चित्र व इतर जिवंत पोट्रेट चित्रांसाठी विख्यात आहेत. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सिटी पॅलेस, जयपूर आणि जामा मशिदीतील फ्रेस्को चित्रांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी हातभार लावला आहे. त्यांना २०१२चा भारत गौरव पुरस्कार देण्यात आला.

सुविज्ञ शर्मा यांच्या अनेक कलाकृती बजाज, बिरला, सिंघानिया, अंबानी, पिरामल, मित्तल व बर्मन सारख्या श्रीमंत व्यक्तींनी खरेदी केलेल्या आहेत.

सुविज्ञच्या कलाकृती सिमरोझा आर्ट गॅलरी, चित्रकूट आर्ट गॅलरी, चेन्नई आर्ट गॅलरी, आर्टिझन्स आर्ट गॅलरी व इंडिया हॅबिटॅट सेंटर यांसारख्या विभिन्न कला दालनांमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह ॲन आर्ट कलेक्टर्स पॅराडाइज प्रकाशित केला. त्यात २४ कॅरेट सोन्याने सजवलेली कलोनियल स्टँप पेपर चित्रे आहेत. या संग्रहाचे प्रकाशन बॉलीवुड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या हस्ते झाले.

१८ ऑक्टोबर २०१५ रोजी, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह फॉरएवर इटरनल पिचवई प्रकाशित केला. या संग्रहाचे प्रकाशन बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतच्या हस्ते झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →