सुलक्षणा पंडित (१२ जुलै, १९५४ - ६ नोव्हेंबर, २०२५) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री, भारतीय पार्श्वगायिका आणि मेवाती घराण्यातील प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होत्या. पंडितने १९७० आणि १९८० च्या दशकात उल्झन, संकोच, हेरा फेरी, अपनापन, चेहरे पे चेहरा, धरम कांटा यांसह अनेक चित्रपटांतून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांनी जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा सह इतर अभिनेत्यांसोबत काम केले. याशिवाय पंडितने १९७८ मध्ये उत्तम कुमार बरोबर बंदी या बंगाली चित्रपटातही काम केले होते.
पंडित यांचे चित्रपट अभिनेते संजीव कुमार यांच्यावर प्रेम होते, परंतु संजीव कुमार यांनी त्यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. तसेच संजीव कुमार हे अविवाहित राहिले होते. सबब पंडित यांनी देखील लग्न केले नाही. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी संजीव कुमार यांचे निधन झाले, ज्यामुळे पंडित खचल्या होत्या. विशेष म्हणजे चाळीस वर्षांनी याच तारखेस, म्हणजे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी पंडित यांचे देखील हृदय विकाराने निधन झाले.
सुलक्षणा पंडित
या विषयावर तज्ञ बना.