पंडित सुरेश तळवलकर (जन्म : चेंबूर-मुंबई, इ.स. १९४८ - हयात) हे हिंदुस्तानी संगीतातील एक मराठी तबलावादक आहेत. त्यांच्या पत्नी पद्मा तळवलकर या गायिका आहेत आणि कन्या सावनी तबलावादक आहेत. सुरेश तळवलकर यांचे व्यावसायिक असलेले चिरंजीव सत्यजित हेही तबला वाजवतात.
सुरेश तळवलकर यांनी सुरुवातीला आपले वडील दत्तात्रेय तळवलकर यांच्याकडून तबला वादनाचे धडे घेतले. पुढचे शिक्षण त्यांनी तबलावादक पंढरीनाथ नागेशकर आणि विनायकराव घांग्रेकर यांच्याकडून घेताले. सुरेश तळवलकर यांनी हिंदुस्तानी संगीताबरोबरच कर्नाटक संगीताचाही अभ्यास केला आहे.
तळवलकर यांनी सारंगीवादक राम नारायण यांना आणि शास्त्रीय संगीत गायक उल्हास कशाळकर यांना अनेकदा तबल्याची साथ केली आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेत संगीताचे कार्यक्रम केले आहेत.
विजय घाटे, पंडित रामदास पळसुले आणि इतर अनेक देशी परदेशी विद्यार्थी पंडित सुरेश तळवलकरांचे शिष्य आहेत..
सुरेश तळवलकर
या विषयातील रहस्ये उलगडा.