सुरिंदर कपूर (२३ डिसेंबर १९२५ - २४ सप्टेंबर २०११) हे एक भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांनी हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. याच सोबत त्यांनी १९९५ ते २००१ पर्यंत फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
कपूर यांचा जन्म ब्रिटिश भारतातील पेशावर येथे (सध्याच्या पाकिस्तानमध्ये) झाला. सुरिंदर कपूर यांचे कुटुंब हे पंजाबी हिंदू असून, आर्य समाजाच्या परंपरांचे पालन करत असे. याशिवाय ते कपूर कुटुंबाचे दूरचे नातेवाईक आहेत. त्यांचे चुलत भाऊ पृथ्वीराज कपूर यांनीच त्यांना हिंदी चित्रपट उद्योगात येण्यासाठी मुंबईला आमंत्रित केले होते. त्यांनी १९५० च्या दशकातील हिंदी चित्रपट अभिनेत्री गीता बालीचे सचिव म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली.
२००९ मध्ये दादासाहेब फाळके अकादमीने त्यांना श्री एलव्ही प्रसाद फाळके पुरस्काराने सन्मानित केले. एसकेइंटरनॅशनल फिल्म्स ही त्यांनी स्थापना केलेली संस्था असून तिच्या यशाचे श्रेय त्यांनी अभिनेते राजेश खन्ना यांना दिले." निर्माता म्हणून त्यांचा हिंदीतील पहिला यशस्वी चित्रपट के. शंकर दिग्दर्शित 'शहजादा' हा होता. हा तमिळ चित्रपट 'इधु साथियम' (१९६३) चा रिमेक होता. तथापि, कपूर यांचे त्यानंतर प्रदर्शित झालेले 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' आणि 'विकास राव' हे दोन्ही चित्रपट अयशस्वी ठरले. या अपयशामुळे कपूर मोठ्या कर्जात बुडाले होते. नंतर मात्र १९८० च्या दशकात निर्माता म्हणून त्यांनी यशस्वी चित्रपटांची निर्मिती करत नुकसान भरून काढले. यातील काही चित्रपट म्हणजे हम पाच, वो सात दिन, लोफर, जुदाई, हमारा दिल आपके पास है, पुकार, नो एन्ट्री हे कन्नड, तमिळ किंवा तेलुगू चित्रपटांचे रिमेक होते. तसेच या सर्व चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत मुलगा अनिल कपूर हे होते. तसेच त्यांचा धाकटा मुलगा संजय कपूर सिर्फ तुममध्ये मुख्य भूमिकेत होते.
२४ सप्टेंबर २०११ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने कपूर यांचे निधन झाले.
कपूर यांचे तीन मुलगे, बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर हे देखील चित्रपट उद्योगात गुंतलेले आहेत. अनिल कपूर हे एक यशस्वी बॉलिवूड अभिनेता आहेत. भारतीय चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांचे लग्न त्यांच्या मोठ्या मुलाशी, बोनी सोबत झाले होते. बोनी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आहेत. त्यांची मुलगी रीना हिचे लग्न मारवाह फिल्म्स अँड व्हिडिओ स्टुडिओजचे संदीप मारवाह यांच्याशी झाले आहे.
सुरिंदर कपूर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.