सुरसुंदरी ही भारतीय शिल्पशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. सुरसुंदरी हे शिल्प भारतातील अनेक मंदिरांच्या कोरीवकामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात यक्षिणी असतात असा समज आहे.
त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील त्याची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीकाराचा हेतू असावा.
"क्षीरार्णव" या संस्कृत ग्रंथात सुरसुंदरी यांच्याविषयी सविस्तर विवेचन आले आहे.
सुरसुंदरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!