सुरंजन दास (२२ फेब्रुवारी १९२० - १० जानेवारी १९७०) हे भारतीय हवाई दलातील वैमानिक होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते रॉयल इंडियन एर फोर्समध्ये सामील झाले आणि भारतीय वायुसेनेसाठी चाचणी वैमानिक म्हणून एम्पायर टेस्ट पायलट्स स्कूलमध्ये पाठवण्यात आलेल्या पहिल्या वैमानिकांपैकी एक होते. ते ग्रुप कॅप्टन होते. त्यांनी १९६७ ते १९६९ दरम्यान हलवारा एर फोर्स स्टेशन बेसचे नेतृत्व केले आणि १९६९ ते मृत्यूपर्यंत ते भारतीय हवाई दलाच्या विमान आणि शस्त्रास्त्र चाचणी गटाचे संचालक होते.
त्यांचे वडील सुधी रंजन दास होते. १० जानेवारी १९७०ला HAL HF-24 प्रोटोटाइपची चाचणी घेत असताना विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. १९७० मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल.
ओल्ड मद्रास रोड आणि ओल्ड एरपोर्ट रोड, बंगलोर यांना जोडणाऱ्या ४.१-किमी रस्त्याला ग्रुप कॅप्टन सुरंजन दास यांच्या नावावरून सुरंजन दास रोड असे नाव देण्यात आले आहे.
सुरंजन दास
थोडक्यात पण महत्त्वाचे.