सुमित्रा हजारिका

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुमित्रा हजारिका या एक भारतीय कार्यकर्त्या आहेत. त्यांचाजन्म भारतातील आसाममधील तिताबोर जवळील एका गावात झाला. त्यांनी भूपेन हजारिका यांचे भाऊ

अमर हजारिका यांच्याशी लग्न केले होते. हजारिका यांच्या मृत्यू नंतर त्यांनी मनिंद्र गोगोई यांच्याशी लग्न केले होते. गोगोई यांचा मृत्यू २०१५ मध्ये झाला. त्या मिशन फॉर इंटिग्रेशन, जेंडर इक्वालायझेशन, हार्मनी अँड फाईट अगेन्स्ट थ्रेट (MIGHT) च्या अध्यक्षा आहेत. हजारिका ह्या आसाम राज्य महिला आयोगासाठी देखील काम करतात. २०२२ मध्ये, त्यांनी राजकारणी शेरमन अली अहमद यांच्या बलात्कारावरील टेलिव्हिजनवरील टिप्पण्यांबद्दल प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. अहवालांनुसार, अली म्हणाले, "बलात्कारासारख्या गुन्ह्याचे कारण काही महिलांचे कमी पोशाख किंवा लैंगिक उत्तेजन देणारे कपडे असतात जे अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि संपूर्ण महिलांच्या प्रतिष्ठेला कलंकित करते."

हजारिका यांच्या सामाजिक कामगिरीची दखल घेत, ८ मार्च २०१७ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१८ मध्ये त्यांना प्राग पेरोना पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →