सुमित्रा महाजन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सुमित्रा महाजन

सुमित्रा महाजन ( १२ एप्रिल १९४३) ह्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या आहेत. त्या २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेच्या सभापती होत्या. त्यांना २०२१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.

१९८४-८५ दरम्यान इंदूर शहराच्या उपमहापौर पदावर राहिलेल्या महाजन १९८९ सालापासून इंदूर मतदारसंघामधून सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत व सध्या सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य राहिलेल्या महिला आहेत. ६ जून २०१४ रोजी त्यांची सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →