एस. जयशंकर किंवा सुब्रह्मण्यम जयशंकर (जन्म:९ जानेवारी, १९५५) हे एक भारतीय मुत्सद्दी आहेत जे ३१ मे २०१९ पासून भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि राज्यसभेचे खासदार आहेत. जयशंकर हे ५ जुलै २०१९ पासून, गुजरातचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी यापूर्वी जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ दरम्यान परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहिले आहे.
ते १९७७ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले आणि त्यांच्या ३८ वर्षांच्या राजनैतिक कारकिर्दीत त्यांनी सिंगापूरमधील उच्चायुक्त (२००७-०९) आणि झेक प्रजासत्ताक (२००१-०४), चीन (२००९-२०१३) आणि यूएसए (२०१४-२०१५) मध्ये राजदूत म्हणून भारत आणि परदेशात विविध पदांवर काम केले. जयशंकर यांनी भारत-अमेरिका नागरी आण्विक कराराच्या वाटाघाटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
निवृत्तीनंतर, जयशंकर टाटा सन्सचे अध्यक्ष, ग्लोबल कॉर्पोरेट अफेअर्स म्हणून रुजू झाले. २०१९ मध्ये, त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मश्री प्रदान करण्यात आला. ३० मे २०१९ रोजी त्यांनी दुसऱ्या मोदी मंत्रालयात केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. ३१ मे २०१९ रोजी त्यांना परराष्ट्र व्यवहार मंत्री बनवण्यात आले. केंद्रीय मंत्री म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रमुख असलेले ते पहिले माजी परराष्ट्र सचिव आहेत.
सुब्रह्मण्यम जयशंकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.