सुबोध भावे (जन्म : ९ नोव्हेंबर १९७५) हा एक मराठी अभिनेता आहे. त्याने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूप वाखाणली गेली. कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. त्यांनी पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत.
सुबोध भावेंनी ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. घुमान येथे २०१५ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या 'महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे व मृणाल कुलकर्णी यांचे होते.
सुबोध भावे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.