सुबांसिरी नदी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सुबांसिरी नदी

सुबांसिरी नदी (तिबेटमध्ये चायुल चू नदी) ही एक ट्रान्स- हिमालयीन नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे जी नैऋत्य चीनमधील शाननान प्रांतातील तिबेटच्या ल्हुन्त्से काउंटी आणि भारतीय राज्ये अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून वाहते. सुबांसिरी सुमारे ५१८ किलोमीटर (३२२ मैल)लांबीची आहे जीचे ३२,६४० चौरस किमी (१२,६०० चौ. मैल) पाणलोट क्षेत्र आहे. ही ब्रह्मपुत्रेची सर्वात मोठी उपनदी असून, ब्रह्मपुत्रेच्या एकूण प्रवाहात तिचा ७.९२% वाटा आहे.

चायुल चू ही नदी तिबेटमध्ये सुमारे ५० किमी अंतर कापल्यानंतर टाक्सिंग शहराच्या जवळ अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी, लुंग गावाजवळ तिला चार चू नदी येऊन मिळते, तसेच अरुणाचल प्रदेशात प्रवेश करण्याच्या अगदी आधी तिला युमे चू येऊन मिळते.

भारतात ही नदी मिरी टेकड्यांमधून पूर्वेकडे आणि आग्नेयेकडे वाहते; त्यानंतर ती दक्षिणेकडे वळून धेमाजी जिल्ह्यातील डुलांगमुख येथे आसाम खोऱ्यात प्रवेश करते आणि लखीमपूर जिल्ह्यातील जामुरीघाट येथे ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. सुबांसिरीच्या लहान उपनद्यांमध्ये रंगंदी, डिक्रोंग आणि कामले यांचा समावेश होतो.

अरुणाचल प्रदेशातील अपर सुबांसिरी आणि लोअर सुबांसिरी या दोन जिल्ह्यांना सुबांसिरी नदीचे नाव देण्यात आले आहे.

१९५० च्या आसाम-तिबेट भूकंपामुळे झालेल्या भूस्खलनामुळे गेरुकामुख येथे सुबांसिरी नदीचा प्रवाह अडवला गेला. तीन दिवसांनंतर बांध फुटल्याने प्रचंड पूर आला. गेल्या काही वर्षांपासून नदीला येणाऱ्या पुरामुळे उपजीविका आणि जीवितहानी झाली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →