लोहित नदी

या विषयातील रहस्ये उलगडा.

लोहित नदी

लोहित नदी ही चीन आणि भारतातील एक नदी आहे, जी भारतातील आसाम राज्यत ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. नदीचे नाव आसामी शब्द "लोहित" या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ रक्त आहे. ह्या नदीला तिबेटी लोकांद्वारे झायुल चू आणि मिश्मि लोकांद्वारे तेल्लू म्हणून देखील ओळखले जाते.

तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या झायुल परगण्यात "कांगरी कार्पो चू" आणि "झायुल चू" ह्या दोन नद्यांच्या विलीनीकरणाद्वारे तयार झाली आहे. ह्या दोन नद्या रिमा शहराच्या खाली विलीन होतात. एकत्रित नदी या डोंगराळ प्रदेशातून खाली उतरते आणि भारतातील अरुणाचल प्रदेशातून २०० किलोमीटर (१२० मैल) पर्यंत वाहते. आसामच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी ती लोहित नदी म्हणून ओळखली जाते. वादळी आणि अशांत असून ही "रक्ताची नदी" म्हणून ओळखली ज्याचे कारण आहे लॅटरिटिक माती. नदी मिश्मी टेकड्यांमधून वाहते,व ब्रह्मपुत्राला भेटते.



धोला सदिया पूल, ज्याला भूपेन हजारिका सेतू असेही संबोधले जाते, हा भारतातील सर्वात लांब पूल आहे जो आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना जोडतो आहे. हा पूल लोहित नदीच्या दक्षिणेकडील ढोला गावापासून उत्तरेला सादियापर्यंत पसरलेला आहे.

परशुराम कुंड हे हिंदू तीर्थक्षेत्र लोहितच्या खालच्या भागात वसलेले आहे. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी ७० हजार हून अधिक भाविक आणि साधू दरवर्षी पवित्र पाण्यात स्नान करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →