सुपिरियर सरोवर (इंग्लिश: Lake Superior; फ्रेंच: Lac Supérieur) हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी सर्वात मोठे सरोवर आहे. सुपिरियर सरोवराच्या उत्तरेला कॅनडाचा ऑन्टारियो हा प्रांत, पूर्वेला अमेरिकेचे मिनेसोटा हे राज्य तर दक्षिणेला मिशिगन व विस्कॉन्सिन ही राज्ये आहेत. पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने सुपिरियर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे (बैकाल सरोवर व टांजानिका सरोवराखालोखाल).
सुमारे २०० लहानमोठ्या नद्या सुपिरियर सरोवराला पाणी पुरवतात. ह्या सरोवराचा बहिर्वाह मुख्यतः सेंट मेरीज नदीमार्गे ह्युरॉन सरोवरामध्ये होतो.
सुपिरियर सरोवर
या विषयातील रहस्ये उलगडा.