सुनीलकुमार लवटे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सुनीलकुमार लवटे

डॉ.सुनीलकुमार लवटे हे मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांचा जन्म ११ एप्रिल, १९५० रोजी पंढरपूर येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण. हिंदी विषयात एम.ए.व पीएच. डी. प्राथमिक शिक्षण व बालपण पंढरपूरमध्ये. पुढे कोल्हापूरमध्ये उर्वरित शिक्षण व जगणे. उच्च शिक्षणासाठी गारगोटी येथील मौनी विद्यापीठात प्रवेश. तिथे परिस्थितीच्या जाणीवेने खडतर अध्ययन. भारत सरकारची शिष्यवृत्‍ती व महाराष्ट्र शासनाचा निर्वाह भत्‍ता या बळावर ग्रामीण विद्यापीठाच्या पदवी समकक्ष शिक्षक पदविकेत भारतात सर्वप्रथम. ’रोल ऑफ ऑनर’ ने भारत सरकारकडून सन्मानित. शालेय वयात साने गुरुजींचे साहित्य, वि.स. खांडेकरांचा सहवास, थोरामोठ्यांची व्याख्याने, आंतरभारती घडण यामुळे आयुष्यभर समर्पित शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्य करत निवृत्‍त. जीवनाच्या प्रत्येक वळणावर समरसून काम करण्याची वृत्‍ती. त्यामुळे प्रत्येक वेळी ’अशक्य ते शक्य करिता सायास’चा ध्यास. हायस्कूल शिक्षक असतानाच डॉक्टरेट मिळवून महाविद्यालयात. महविद्यालयात पुस्तके लिहून विद्यापीठात. प्राचार्य म्हणून उपक्रमांचा उच्चांक. अशा सतत ऊर्जस्वलतेमुळे जगण्याचा अनिवार ध्यास. सन २०१० मध्ये निवृत्‍त. त्यातूनच मग स्वावलंबनानंतर अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यासाठी १९८० ते २००० असं दोन दशके अविरत सक्रिय प्रयत्न. कोल्हापूरच्या ’रिमांड होम’चे ’बालकल्याण संकुल’ मध्ये रूपांतर. महाराष्ट्र राज्य वंचित संस्थेचे अध्यक्षपद. ’समाज सेवा’ त्रैमासिकाचे संपादन. भारतीय शिष्टमंडळातून युरोप, आशिया खंडातील १५ देशांचे अभ्यास दौरे. त्यातून महाराष्ट्रभरच्या अनाथाश्रम, रिमांड होम्ससंबंधी प्रशासन यंत्रणा विकेंद्रीकरण, योजनांचे एकत्रीकरण, संस्था दर्जा सुधारणा, बालक धाेरण, बालकांचा राष्ट्रीय कायदा व ह्नकासंबंधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचे कार्य व सन्मान. सध्या सर्व पदांचा त्याग. मुक्त कार्यरत. हे सारे करीत मराठी, हिंदीत विपुल लेखन. आत्मकथा, लेखसंग्रह, कथासंग्रह, भाषण संग्रह, काव्य संग्रह, याशिवाय भाषांतर, संपादन, समीक्षात्मक लेखन. लेखनास महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका), भाषांतर व समीक्षेस भारत सरकारचे राष्ट्रीय पुरस्कार. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी जीवन गौरव, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्काराने गौरव. अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. महाराष्ट्रात अनेक वस्तुसंग्रहालयांंची निर्मिती.



राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवी दिल्ली येथील जिल्हाधिकारी म्हणून तपभर काम. कारागृह पोलीस चौकी सुधारणा व बंदी बांधवांना मानवाधिकार प्रदान. कोल्हापूरच्या वंचित विकास, शिक्षण, साहित्य, संस्कृती उपक्रमांची नोंद घेऊन ’कोल्हापूर भूषण’ हा नागरी सन्मान. पुरस्कार, लेखन, व्याख्याने, मानधन, ’सामाजिक संकल्प निधी’ मानून आजवर मिळालेल्या सुमारे दहा लाख रुपयांची रक्कम विविध शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक संस्थांना व व्यक्तींंना अर्पण. साहित्य कृतीची हिंदी, गुजराती, इंग्रजी, ब्रेलमध्ये भाषांतरे. अनेक आकाशवाणी केंद्रांवरून या आत्मकथेचे अभिवाचन प्रसारण. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आत्मकथेचा पाठ्यपुस्तक म्हणून समावेश.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →