सुनीता चंद राजवार ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांमध्ये काम करण्यासाठी ओळखली जाते. तिने १९९७ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली येथून पदवी प्राप्त केली. ती एक चालीस की लास्ट लोकल (२००७), शुभ मंगल ज्यादा सावधान (२०२०), बाला (२०१९), स्त्री (२०१८), केदारनाथ (२०१८) आणि सोनीलिव्ह च्या हास्यमालिका गुल्लक मधीलतिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. गुल्लक मधील कामगिरीमुळे तिला विनोदी मालिकेतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेर ओटीटी पुरस्कार मिळाला आहे
तिने संजय खंडुरी यांच्या दिग्दर्शनात एक चालीस की लास्ट लोकलमध्ये गँगस्टर चकली म्हणून काम केले होते, जिथे तिला ब्रेकथ्रू परफॉर्मन्स – महिला या श्रेणीमध्ये मॅक्स स्टारडस्ट पुरस्कार २००८ साठी नामांकन मिळाले होते.
सुनीता राजवार
थोडक्यात पण महत्त्वाचे.