मिताली जगताप वराडकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी मराठी चित्रपटसृष्टीत काम करते. ती बाबू बँड बाजा (२०१०) मधील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते, ज्याने तिला ५८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. "परिस्थितीने नाकारलेल्या भविष्यापेक्षा आपल्या मुलासाठी चांगले भविष्य मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या आईचे कौशल्यपूर्ण चित्रण" करण्यासाठी ज्युरीने हा पुरस्कार प्रदान केला.
वराडकर ही एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि तिने चित्रपट कारकिर्दीत येण्यापूर्वी औरंगाबाद, महाराष्ट्र येथे प्रायोगिक रंगभूमीवर काम केले आहे. अनेक एकांकीकांमध्ये तिने काम केले व स्पर्धांमध्ये भाग घेतला. पण व्यावसायिक अभिनय भूमिकांमध्ये प्रवेश करण्यासाठी, तिच्या पालकांनीही तिच्या निर्णयाला पाठिंबा दिल्यावर तिने मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या पालकांनी तिला "स्मिता पाटीलसारखे" बनण्यास सांगितले. तिचे पहिले हिंदी भाषेतील नाटकनो एक्झिट होते. २००० मध्ये तिला राजू या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटात काम करण्याची पहिली संधी मिळाली व नविन पदार्पणाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. तिने अनेक हिंदी व मराठी दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले.
लग्नाच्या छोट्या विरामानंतर ती पुन्हा बाबू बँड बाजा (२०१०) मध्ये अभिनयास परतली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा झळकला ज्यात तिने बाबूच्या आईची भूमीका साकारली. तिचा पहिला हिंदी चित्रपट सत्याग्रह हा प्रकाश झा दिग्दर्शित आणि २०१३ मध्ये प्रदर्शित झाला. तिने द टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिने तिचा पहिला सीन दिला तेव्हा अमिताभ बच्चनने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. तथापि, चित्रपटात फक्त चार सीन असल्याने ती निराश झाली; त्यापैकी फक्त दोनच संपादनानंतर राहिले. तिचा आवाजाचे डबिंग देखील दीप्ती नवलने केले होते, कारण झा यांना वाटले की तिचा आवाज "पात्रासाठी खूप मजबूत" आहे.
मिताली जगताप वराडकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!