सुखदेव सिंग धिंडसा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुखदेव सिंग धिंडसा

सुखदेव सिंग धिंडसा (९ एप्रिल, १९३६ - २८ मे, २०२५) हे राज्यसभेचे सदस्य होते. ते शिरोमणी अकाली दल (संयुक्त) चे एकेकाळी अध्यक्ष होते. या पक्षाची स्थापना धिंडसा यांनी केली होती. त्यांचा यापूर्वीचा पक्ष शिरोमणी अकाली दल (डेमोक्रॅटिक) आणि रणजितसिंग ब्रह्मपुरा यांचा शिरोमणी अकाली दल (टकसाली) यांच्या विलीनीकरणातून स्थापन करण्यात आला होता. मार्च २०२४ मध्ये त्यांनी शिरोमणी अकाली दल मध्ये त्यांचा पक्ष विलीन करत मूळ पक्षात परत प्रवेश केला. ते यापूर्वी पंजाबमधील संगरूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भारताच्या १४ व्या लोकसभेचे सदस्य होते. २६ जानेवारी २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तथापि, डिसेंबर २०२० मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी हा पुरस्कार परत केला होता.



सुखदेव सिंह धिंडसा यांचा जन्म ९ एप्रिल १९३६ रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील उबवाल गावात झाला. त्यांनी संगरूर येथील सरकारी रणबीर कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

२००० ते २००४ पर्यंत ते तिसऱ्या वाजपेयी मंत्रिमंडळात क्रीडा आणि रसायने आणि खते मंत्री होते. ते १९९८ ते २००४ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते त्यांचा मुलगा परमिंदर सिंग धिंडसा २०१२ ते २०१७ पर्यंत पंजाबचे अर्थमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →